Home Crime खंडणीसाठी अपहरण, गुन्ह्यातील दोन्ही आरोपींना अटक

खंडणीसाठी अपहरण, गुन्ह्यातील दोन्ही आरोपींना अटक

57
0

दिनांक 24 जानेवारी 2021रोजी पोउनि केंगार हे ठाणे अंमलदार कर्तव्यावर असताना इसम नामे… वय 42 वर्षे यांनी अशी तक्रार दिली की कोणीतरी अज्ञात इसमाने त्यांचा मुलगा **वय 13 वर्ष याचे दहा लाख रुपयांच्या खंडणीसाठी अपहरण केलेले आहे.
सदर तक्रारीवरून तात्काळ मालाड पोलीस ठाणे गुन्हा नोंद क्रमांक 30/2021 कलम 363, 364 भा द वि अन्वये दाखल करण्यात आला.
नमूद गुन्ह्याची माहिती तात्काळ माननीय वरिष्ठांना देण्यात आली. माननीय वरिष्ठांच्या आदेशान्वये व मार्गदर्शनाप्रमाणे वेगवेगळी पथके तयार करून अपहरण झालेल्या अल्प वयीन मुलाचा व आरोपींचा शोध घेण्यात आला.
अपहरण झालेला मुलगा व एक आरोपी नामे दिव्यांशू माताभिक विश्वकर्मा वय 21 वर्ष असे कांतीलाल माखिजा मैदान, अतुल टॉवर जवळ, कांदिवली पश्चिम, मुंबई याठिकाणी मिळून आले. तर दुसरा आरोपी नामे शेखर अंगनू प्रसाद विश्वकर्मा वय 35 वर्ष हा आंबा वाडी लिंक रोड, फूटपाथ जवळ, कांदिवली पश्चिम, मुंबई. या ठिकाणी मिळून आला.
अशाप्रकारे अपहरण झालेल्या मुलाची गुन्ह्याची माहिती मिळाल्या पासून दोन तासाचे आत सुखरुप सुटका करण्यात आली आणि गुन्ह्यातील दोन्ही आरोपींना अटक देखिल करण्यात आलीआहे